Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana

Table of Contents

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रस्तावना;-

महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी युवक हे मोठ्या संख्येने आपले शिक्षण पूर्ण करून नोकरी व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी बाहेर पडतात. अशा युवकांना नोकरी व्यवसायातील अनुभवाची कमी असल्याने त्यांना तू व्यवसाय करणे किंवा ती नोकरी कमावणे कठीण जाते, असे सरकारच्या निदर्शनास आले आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि युवकांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणी चा निर्णय घेतला आहे. नुकत्याच चर्चेत आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण नंतर मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ असेही या योजनेला संबोधले जात आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत बारावी पास व विविध ट्रेड मधील आयटीआय पदवीधारक पदवी व पदवीचे युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध असली आणि उद्योग क्षेत्रामध्ये ही त्यांची गरज असली,  तरी या दोघांमध्ये समन्वय साधनाऱ्या दुव्यांच्या अभावा कारणाने युवकांना शिक्षण नंतर अनुभव नसल्याने पूर्णपणे रोजगार मिळवणे कठीण जात आहे. यावर उपाय म्हणून महाराष्ट्राचा राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे.

महाराष्ट्र राज्य शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना 1974 पासून राबविण्यात येत होती. या योजनेचा फायदा अधिकाधिक लोकांना भावा यासाठी कालांतराने त्यामध्ये काही आवश्यक बदल करण्यात आले. असाच एक बदल म्हणून 2024 मध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आले आहे.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा मुख्य हेतू;-

राज्यातील युवकांना त्यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्षपणे कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी, Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४ – २०२५ या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात ची मान्यता महाराष्ट्र राज्य सरकार कडून देण्यात आले आहे.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप खालील प्रमाणे;-

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्य विभाग आणि मुख्यमंत्री जलकन्याक्ष यांच्यामार्फत मिळून Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही राबवली जाणार आहे या या उपक्रमासाठी तयार केलेल्या संकेतस्थळावर रोजगार करू इच्छिणारे उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक या दोन्हीकडून नोंदणी केली जाईल यामधून रोजगार करू इच्छिणाऱ्या युवकांना रोजगार रोजगाराचा प्रत्यक्ष अनुभव आणि उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी लागणारे अपुरे मनुष्यबळ पूर्ण करण्यात मदत होईल त्यामधून काम देणारा आणि काम घेणारा या दोघा दोघांना संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

  1. Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या करिता विभागाच्या संकेतस्थळावरून आवश्यक असलेली सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामध्ये योजनेचे कामकाज उदाहरणार्थ उमेदवारांची नोंदणी, कार्य प्रशिक्षण व्यवसायाची नोंदणी, त्यांची हजारी नोंदवणे, विद्या वेतन प्रदान करणे, प्रशिक्षणासाठी रुजू आणि समाप्तीचा नोंदणी करणे, अनुभवाचे प्रमाणपत्र, इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येतील.  या योजनेच्या  आवश्यक सुविधा पुरावण्याची जबाबदारी आयुक्त कौशल, विकास रोजगार व उद्योजकता यांची राहील.
  2. या योजनेमध्ये आय.टी.आय., बारावी, पदवी, पदविका व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले युवक/ रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील.
  3. लघु आणि मध्यम (SMEs) व मोठे उद्योग, सहकारी संस्था, शासकीय व निम शासकीय  आस्थापना /महामंडळ, सामाजिक संस्था (कंपनी कायदा, 2013 मधील सेक्शन ८) आणि विविध स्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी हे या Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने मार्फत तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंद करतील. किमान 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्यप्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी पात्र ठरतील. आस्थापना /उद्योगांमध्ये सुमारे १० लाख कार्य प्रशिक्षणासाठी संधी प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये या Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतुन उपलब्ध होतील. या योजनेमध्ये पात्र उद्योग यांची यादी हि यादी क्रमांक १ मध्ये नमूद केलेली आहे.
  4. शासकीय किंवा निमशासकीय आस्थापना /उद्योग /महामंडळाची संबंधित तालुका /जिल्हा /विभाग /राज्यस्तरीय कार्यालय ही Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत मनुष्यबळाचे मागणी करू शकतात.
  5. Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची मदत ही रोजगार इच्छुक उमेदवारांना आणि उद्योगाचे कुशल मनुष्यबळ साठी मागणी करणाऱ्या उद्योजकांना जोडण्यासाठी होईल.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या उमेदवारांची पात्रता;-

  1. रोजगारासाठी इच्छुक उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 35 वर्ष इतके असावे.
  2. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही किमान बारावी पास, आयटीआय, पदविका, पदवी किंवा पदवीधर इतकी असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार हे या योजनेत सहभागास पात्र ठरणार नाहीत.
  3. इच्छुक उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
  4. इच्छुक उमेदवाराचे आधार नोंदणी असणे आवश्यक आहे.
  5. उमेदवाराचे बँक खाते त्याच्या आधार कार्ड बरोबर संलग्न असणे अनिवार्य राहील.
  6. इच्छुक उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचे संकेतस्थळावरून नोंदणी करून त्यानंतर मिळणारा रोजगार नोंदणी क्रमांक मिळवणे आवश्यक आहे.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने साठीच्या आस्थापना उद्योग यासाठीची पात्रता खालील प्रमाणे राहील;-

  1. Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील आस्थापना /उद्योग हे महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावेत.
  2. आस्थापना/ उद्योग आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असणे आवश्यक असेल.
  3. आस्थापना किंवा उद्योगाची स्थापना ही किमान ०३ वर्ष पूर्वीची असणे अनिवार्य राहील.
  4. आस्थापना/ उद्योगांची EPF, ESIC, GST, Certificate of incorporation, DPIT व उद्योग आधारची नोंदणी केलेली असणे अनिवार्य असेल.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे उद्योजकांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कार्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाईल त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल;-

  1. Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे उमेदवार होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या या योजनेसाठीच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे अति आवश्यक आहे.
  2. आस्थापना/ उद्योग/ महामंडळातर्फे अनुभव नसलेल्या पण रोजगार करू इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना/ उद्योग/ महामंडळ यामध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत कार्यप्रशिक्षणाद्वारे कुशल प्रकारचे प्रशिक्षण देणे हे उद्योजकांकडून अपेक्षित आहे.
  3. Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी हा सहा महिने असेल, सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येणार आहे.
  4. आस्थापना किंवा उद्योग/ महामंडळामध्ये कार्य प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडल्यानंतर त्यांना शासकीय नमुण्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
  5. या योजनेच्या कार्य प्रशिक्षण नंतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांना उद्योग/ आस्थापनांना योग्य वाटल्यास आणि उमेदवार इच्छुक असल्यास ते त्यांना रोजगाराची संधी देऊ शकतात या दृष्टीने ही योजना कार्य करत आहे.
  6. या योजनेमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही.
  7. मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांचे शैक्षणिक पात्रते प्रमाणे विद्यावेतन दिले जाईल, या विद्या वेतनाचे आराखडा यादी क्रमांक २ प्रमाणे राहील.
  8. Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत नमूद केल्याप्रमाणे विद्यावेतन हे दर महिन्याला शासनाद्वारे उमेदवारांना प्रदान करण्यात येईल. पात्र असणाऱ्या उमेदवारांचे कार्य प्रशिक्षण घेत असताना, हजरी संबंधित नोंद हि आस्थापना/ उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. ऑनलाइन उपस्थितीच्या आधारे उमेदवारांना विद्यावेतन हे उमेदवारांच्या थेट बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने दर महिन्याला जमा करण्यात येईल.
  9. उद्योजक प्रशिक्षणार्थींना सदर विद्यावेतना व्यतिरिक्त आणखीन मोबदला देण्यास इच्छुक असेल तर उमेदवार ते अतिरिक्त स्वरूपात घेऊ शकतात.
  10. या कार्य प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये उमेदवार एका महिन्यामध्ये १० दिवस किंवा १० दिवसांच्या पेक्षा जास्त दिवस गैरहजर असेल तर त्याचे पूर्ण महिन्याचे विद्यावेतन ग्राह्य धरले जाणार नाही
  11. उमेदवाराने वरील अटीची पूर्तता जरी केली असेल परंतु उमेदवार पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास त्या उमेदवाराला त्या महिन्याचे विद्यावेतन मिळणार नाही.
  12. या योजनेचा आढावा हा दर दोन वर्षांनी घेतला जाईल, आवश्यक वाटल्यास त्यामध्ये बदलही केले जातील.
  13. Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत उमेदवार प्रशिक्षण घेताना जर कायम/ नियमित स्वरूपाचा रोजगार किंवा स्वयंरोजगार प्राप्त झाल्यास अथवा प्रशिक्षण सोडून गेल्यास, अनधिकृत गैरहजर राहिल्यास योजनेअंतर्गत त्या उमेदवाराला विद्या वेतन घेता येणार नाही.
  14. या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारी (NAPS/ MAPS) पूर्ण केलेले व करीत असलेले उमेदवार पात्र राहणार नाहीत.
  15. एका उमेदवाराला या योजनेचा लाभ फक्त एकाच वेळी घेता येईल.
  16. या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापना/ उद्योजकांकडे एकूण कार्यरत असणाऱ्या मनुष्यबळाच्या १० % व सेवा क्षेत्रातील २०% इतकी उमेदवार हे कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील. केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय/ निमशासकीय आस्थापना/ उद्योग/ महामंडळ यामध्ये मंजूर पदांच्या ५% उमेदवार हे प्रशिक्षणासाठी घेता येणार आहेत. आस्थापना उद्योग यांनी त्याच्याकडील कार्यरत मनुष्यबळांची अचूक माहिती देणे गरजेचे आहे, जर ही माहिती चुकीची आहे आढळल्यास यावरील कारवाईस कार्यालयातील प्रमुख/  प्राधिकृत अधिकारी जबाबदार राहतील.
  17. राज्यातील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP-२०२०) अंतर्गत नवीन अभ्यासक्रम आराखड्याची अंमलबजावणी ही सर्व महाविद्यालय व विद्यालय विभागातील पदवी व पदव्युत्तर  अभ्यासक्रमासाठी सुरू करण्यात आले आहे. तसेच शैक्षणिक वर्ष २०१५ पासून नवीन  अभ्यासक्रम आराखडा राज्यातील अकृषि विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी लागू करण्यात आला आहे. नवीन अभ्यासक्रम आराखड्यांतर्गत एकूण ६ वर्टीकल पैको ५ व्या आणि ६ व्या वर्टीकल्स मध्ये कौशल्य आधारित अभ्यासक्रम ऑन जॉब ट्रेनिंग (OJT) आणि Apprenticeship या नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमाचा ही समाविष्ट करण्यात आला आहे. युवकांनी कौशल्य पूर्ण प्रशिक्षण घ्यावे, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग घ्यावे, स्किल ट्रेनिंग शिकावे, तांत्रिक प्रशिक्षण देऊन तरुणांना रोजगार क्षमता वाढवून त्यांना मदत करावी, तसेच शिक्षण घेताना कामाच्या ठिकाणी कामाचे संबंध करता यावे या उद्देशाने ज्या अभ्यासक्रमात कमीत कमी सहा महिने ऑन जॉब ट्रेनिंग (OJT)  किंवा Apprenticeship सुरू केलेले आहे अशा अभ्यासक्रमांमधील विद्यार्थी देखील Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी पात्र ठरतील.
  • Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी राज्यस्तरीय नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडे या योजनेचा आढावा तसेच योजनेमध्ये धोरणात्मक सुधारणा आणि बदल करण्याचे काम सोपवले आहे. समितीची बैठकी जर चार महिन्याने किंवा आवश्यकतेनुसार घेण्यात येईल.
  • जिल्हास्तरीय स्थापन केलेली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती वेळोवेळी या योजनेचा आढावा घेईल, तसेच योजनेसंबंधी स्थानिक स्तरावरील आणि अड़ी-अडचणीचे निराकरण करेल. या समितीची बैठकी दर महिन्याला घेतली जाईल.
  • Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठिची अंमलबजावणी हे संपूर्ण रित्या जबाबदारी ही आयुक्त, कौशल्य, विकास, रोजगार, व उद्योजकता आयुक्तालय यांचे राहील.

यादी क्रमांक १

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पात्र आस्थापना उद्योग यांची यादी.

अ.क्र.आस्थापना/ उद्योगउदाहरण
 खाजगी/  सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगनोंदणीकृत लघु आणि माध्यम (SEMs) व मोठे उद्योग
 शासकीय/ निमशासकीय आस्थापनाकेंद्र अथवा राज्य शासन अंतर्गत आस्थापना/ महामंडल
 स्टार्टअपDPIT मधील नोंदणीकृतस्टार्टअप
 सहकारी संस्थाजिल्हा सहकारी बैंक, शेड्यूल्ड बैंक, साखर कारखाने, सुत गिरणी व सहकारी तत्वावरील उद्योग
 सामाजिक संस्थाकंपनी कायदा, २०१३ मधील सेक्शन ८ अंतर्गत स्थापन सामाजिक संस्था 
 सेवा क्षेत्रातील खाजगी/ सार्वजनिक आस्थापना /कंपन्या /उपक्रम /संस्थाCA Firm, Law Firm, Media, NBFC, NSE/BSE, Retail, Insurance, Hospitality, Health, Taxation, Logistics, Tourism,etc.

यादी क्रमांक २

अ.क्र.शैक्षणिक पात्रताप्रतिमाह विद्यावेतन रु.
१.१२ वी पासरु. ६,०००/-
२.आय.टी.आय./ पदविकारु. ८,०००/-
३.पदविधर/ पदव्युत्तररु. १०,०००/-
Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने मध्ये अर्ज करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index

टिप;- सदर यादी अंतिम नसून यामध्ये अवश्यकते नुसार वाढ करण्यात येईल.           

महाराष्ट्र मध्ये शिक्षण पूर्ण करून नव्याने बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्योग जगतातील अनुभव नसल्याने त्यांना नोकरी मिळवणे कठीण जाते. अशा युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना अनुभवी बनवणे, हे Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेचे प्रमुख उद्देश आहे. तसेच उद्योजकांना भासणाऱ्या कुशल मनुष्यबळाची आवश्यकता हे देखील भरून काढणे हे Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेतून साध्य करण्यात येत आहे. Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यामुळे भविष्यामध्ये निर्माण होणारे बेरोजगारी व उद्योग जगतामध्ये कुशल कामगारांची टंचाई याचा प्रश्न सुटणार आहे. तरी Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जास्तीत जास्त युवकांना शेअर करून त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण मदत करावी. असेच नवनवीन योजना जाणून घेण्यासाठी आमचा सरकारी योजना हा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंक वर क्लिक कराhttps://chat.whatsapp.com/G0DyfdwhOuS4ewvEY3sov1 त्यामध्ये आपल्याला नवनवीन येणाऱ्या सरकारी योजना बद्दल माहिती तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्ही सरकारी योजनेच्या कोणत्याही लाभापासून वंचित राहणार नाही.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा-https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-mazi-ladaki-bahin-yojana-2024/#more-233

मोदी आवास घरकुल योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा-https://blogwithsagarmane.com/modi-awas-gharkul-yojana-2024/#more-338

मुख्यमंत्री लेक लाडकी योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/lek-ladaki-yojana-2024/

हे पण पहा- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-tirth-darshan-yoajana-2024/

हे पण पहा- मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक कराhttps://blogwithsagarmane.com/mukhyamantri-vayoshri-yojana-2024/#more-319