Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ प्रस्तावना ;-
Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ ही जुन्या माझी कन्या भाग्यश्री योजनेची सुधारित भाग आहे. मुलींचा जन्मदर वाढवणे, तसेच मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने १ ऑगस्ट २०१७ मध्ये माझी कन्या भाग्यश्री ही योजना अमलात आणली होती. पण या योजनेसाठी मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेता या योजनेमध्ये नवीन बदल करणे आवश्यक होते. या कारणास्तव माझ्या कन्या भाग्यश्री यामध्ये आवश्यक बदल करून, महाराष्ट्र सरकारने २०२३-२४ मध्ये नवीन योजना अमलात आणली. या योजनेचे नाव Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ असे ठेवण्यात आले. Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ या योजनेमधून पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येणार आहे. लाभार्थी मुलींचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ७५०००/- रोख रक्कम देण्यात येईल, अशी घोषणा महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली आहे. लेक लाडकी योजनेच्या मुळे महाराष्ट्र मधील मुलींचे जन्म प्रमाण वाढले जाईल व त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन भेटेल.
Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ या योजनेसाठी शासन निर्णय;-
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अपुरा प्रतिसाद बघता दिनांक १ एप्रिल २०२३ पासून महाराष्ट्र मध्ये मुलींच्या जन्मानंतर त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी आणि त्यांचे शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ सुरू करण्यात आली आहे.
हे पण पहा- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा-https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-mazi-ladaki-bahin-yojana-2024/#more-233
Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ या योजनेचा मुख्य हेतू;-
- Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ योजनेमुळे मुलीचे जन्मास प्रोत्साहन मिळेल व त्यामुळे मुलींचा जन्मदर वाढेल.
- Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ योजनेमुळे मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन मिळेल व त्यांना शिक्षण घेण्यासाठी सुविधा उपलब्ध होतील.
- मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे.
- कुपोषण कमी करणे.
- Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ योजनेमुळे जास्तीत जास्त मुलींना शिक्षणाचा लाभ घेता येणार आहे व शिक्षण न घेणाऱ्या मुलींच्या टक्केवारीत घट होणार आहे.
Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ या योजनेचा लाभ;-
Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ मध्ये काही अटी व शर्ती नमूद केलेले आहे. त्या अटी आणि शर्तींची पूर्तता झाल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पिवळ्या व केसरी रेशनकार्ड धारक कुटुंबात मुलींच्या जन्मांतर त्यांना ५०००/- रुपये, इयत्ता पहिली मध्ये ६०००/- रुपये, इयत्ता सातवी मध्ये ७०००/- रुपये, इयत्ता अकरावी मध्ये ८०००/- रुपये, तर लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५०००/- रुपये असे एकूण प्रमाणे १,०१,०००/- एवढी रक्कम महाराष्ट्र सरकारकडून मुलींसाठी देण्यात येणार आहे.
हे पण पहा- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-tirth-darshan-yoajana-2024/
Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४अटी व शर्ती;-
- Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ ही योजना पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारक कुटुंबामधील दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या पहिल्या किंवा दोन्ही मुलींना लागू होणार आहे. तसेच अशा कुटुंबामध्ये एक मुलगा किंवा मुलगी असल्यास फक्त मुलगी साठी योजना लागू राहणार आहे.
- पहिल्या अपत्यासाठी घेतलेले योजनेत तिसऱ्या हप्त्याच्या वेळी आणि दुसऱ्या अपत्त्यासाठी घेतलेले योजनेत दुसऱ्या हप्त्यावेळी अर्ज करत असताना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया बद्दलचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
- Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ योजनेचा लाभ घेतल्यानंतर दुसऱ्या अपत्यावेळी जर जुळी अपत्य जन्माला आली तर त्यामधील एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे, मात्र त्यानंतर माता-पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया बद्दलचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
- Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ योजनेमध्ये दिनांक १ एप्रिल २०२३ पूर्वी जन्मलेला मुलगा किंवा मुलगी आहे त्यांना Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ योजनेचा लाभ घेत येणार नाही, १ एप्रिल २०२३ नंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्रपणे) योजनेचा फायदा घेता येईल, मात्र माता-पित्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
- Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ लाभार्थ्यांचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे अनिवार्य आहे.
- Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ योजनेसाठी लाभार्थ्याचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
- सदर योजनेसाठी लाभार्थी कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे रक्कम १ लाखापेक्षा जास्त नसावे.
Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे;-
- Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ योजनेसाठीच्या लाभार्थीचा जन्माचा दाखला.
- लाभार्थीच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला हा तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्यांकडून तयार करण्यात आलेला असावा. वार्षिक उत्पन्न हे १ लाखापेक्षा जास्ती नसावे.
- Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ लाभार्थीचे आधार कार्ड ( प्रथम लाभावेळी ही अट शिथिल करण्यात येणार आहे).
- लाभार्थीच्या पालकांच्या आधार कार्ड.
- बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी.
- पिवळे रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड ची साक्षांकित झेरॉक्स.
- लाभार्थीचे मतदान ओळखपत्र( लेक लाडकी योजनेच्या शेवटच्या लाभासाठी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदार यादी मध्ये मुलीचे नाव दाखल असल्याचा दाखला अनिवार्य राहील).
- Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ योजनेमधील टप्प्यानुसार मिळणाऱ्या लाभासाठी शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला अनिवार्य राहील.
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र. (पहिल्या अपत्यासाठी तिसऱ्या हप्त्यावेळी अर्ज करताना आणि दुसऱ्या अपत्त्यासाठी दुसऱ्या हप्त्यावेळी वेळी अर्ज करताना).
- Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ या योजनेच्या अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील. (अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयंघोषणापत्र देणे आवश्यक राहील)
हे पण पहा- मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-yuva-karya-prashikshan-yojana/#more-291
Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ योजनेसाठी सविस्तर माहिती;-
- Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ योजनेअंतर्गत लाभासाठी मुलीच्या पालकांनी १ एप्रिल २०२३ रोजी व त्यानंतरच्या जन्मलेल्या मुलीची जन्म नोंद ही संबंधित ग्रामीण अथवा नागरिक क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेत करावी. नोंद झाल्यानंतर अंगणवाडी सेविकेकडे या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज सादर करावा. परिशिष्टामध्ये मध्ये आवश्यकतेनुसार काही बदल करण्याची गरज असल्यास त्याबाबतचे बदल हे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या स्तरावरून करून घ्यावेत. Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४योजनेसाठी लागणारे आवश्यक अर्ज हे राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी जिल्हा कार्यालय अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त, महिला बाल विकास यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील. संबंधित अंगणवाडी सेविकेने संबंधित लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घ्यावा. गरजेप्रमाणे लाभार्थ्यास अर्ज भरण्यास मदत करावी आणि सदर अर्ज अंगणवाडी पर्यवेक्षिका/ मुख्यसेविका यांच्याकडे जमा करावा.
- अंगणवाडी पर्यवेक्षिका/ मुख्यसेविकांनी जमा केलेल्या अर्जांची व प्रमाणपत्राची तपासणी/ छाननी करून प्रत्येक महिन्याला नागरी व ग्रामीण क्षेत्रातील बालविकास प्रकल्प अधिकारी यथे द्यावीत. तसेच संस्था मधील अनाथ मुलींचे बाबतीत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांची एकत्रितपणे यादी जिल्हा कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना किंवा मुंबई शहर मुंबई उपनगर मध्ये संबंधित क्षेत्रातबाबतीत निवडलेले नोडल अधिकारी यांना मान्यतेसाठी सादर करावी. जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद किंवा नोडल अधिकारी यांनी योग्य ती छाननी/ तपासणी करून यादीस मान्यता देऊन आयुक्तालयामध्ये ती सादर करावी. अनाथ मुलींना Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ योजनेचा लाभ मिळण्याबाबत अर्ज करत असताना महिला व बालविकास विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांकडून/ प्राधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले अनाथ प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
- संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी व जिल्हा कार्यक्रमाधिकारी जिल्हा परिषद हे जास्त अर्ज प्राप्त झालेल्या जागेमधील अर्जाची तपासणी करून त्यांचे खात्री झाल्यानंतर लाभार्थी यादीला अंतिम मान्यता देतील.
- पर्यवेक्षिका, बालविकास प्रकल्पाधिकारी यांनी त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या अर्जाची शहानिशा करून एखादा अर्ज संपूर्ण भरलेला नसल्यास अथवा सर्व प्रमाणपत्राची पूर्तता केलेली नसल्यास असा अर्ज मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत पुर्तता करण्याकरता अर्जदारास लेखी कळविण्यात येईल. त्याप्रमाणे अर्जदाराने ०१ महिन्याच्या आत मध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, आणि अर्ज दाखल करावा. काही अपरिहार्य कारणास्तव अर्जदार या मुदतीमध्ये अर्ज दाखल करू शकला नाही, तर त्यास वाढीव १० दिवसांची मदत देण्यात येणार आहे. अशा प्रकारे कमाल ०२ महिन्यांच्या कालावधीमध्ये Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ योजना अर्जावर कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे.
- Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ योजनेअंतर्गत एका महिन्यामध्ये भरलेली एकूण फॉर्म यापैकी अपूर्ण व निकाली काढलेल्या अर्जांचा अहवाल हा प्रत्येक महिन्याच्या ०५ तारखेपर्यंत जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद नोडल अधिकारी यांनी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालय मध्ये सादर करण्यात येणार आहे.
- Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ योजना अंतर्गत लाभार्थ्यांना विविध टप्प्यावर देण्यात येणारा लाभ हा थेट लाभार्थी हस्तांतरण (DBT) द्वारे देण्यात येणार आहे. त्याकरता महिला व बालविकास स्तरावरून निश्चित करण्यात आलेल्या बँक मध्ये आयुक्तालय स्तरावर खाते उघडण्यात मदत केली जाणार आहे. त्या खात्यामध्ये पोर्टल प्रमाणे लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता ग्रामीण क्षेत्रामध्ये जिल्हा कार्यक्रमाधिकारी, महिला व बालविकास जिल्हा परिषद यांना तर नगरि क्षेत्रामध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी यांना आवश्यक निधी वर्ग करण्यात येणार आहे. तो निधी थेट लाभार्थी हस्तांतरण (DBT) द्वारे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
- Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे बँक पासबुक असणे आवश्यक आहे. यासाठी लाभार्थी व माता यांच्या संयुक्त खाते उघडणे अनिवार्य राहील. एखाद्या प्रकरणी जर मातेचा मृत्यू झाला असल्यास, लाभार्थी व पित्याचे संयुक्त खाते ग्राह्य केले जाईल. मात्र अशा परिस्थितीमध्ये मातेचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. अनाथ मुलींना लाभ देताना विभागाच्या इतर योजनांचा लाभ ज्या पद्धतीने त्यांना देण्यात येतो त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे.
- Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४या योजनेचा लाभ घेतलेल्या कुटुंबियांना म्हणजे एक अथवा काही टप्प्यांमध्ये लाभ घेतल्यानंतर राज्यातील अन्य जिल्ह्यात स्थलांतरित झाले असेल, तर या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी स्थलांतरित झालेल्या संबंधित जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अधिकारी यांचे कडून अर्ज सादर करण्यात यावा.
- सदर सदर अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडून छाननी/ तपासणी करून, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम निर्णय घेतला जाईल.
- Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ या योजनेचा लाभ घेतलेल्या कुटुंबियांना एक अथवा काही टप्प्यांमध्ये या योजनेचा लाभ घेतला असेल, आणि नंतर राज्यात बाहेर स्थलांतरित झाले असल्यास त्यांनी थेट राज्य कक्षाकडे अर्ज करावा व तपासणी नंतर या संबंधित योग्य तो निर्णय राज्य कक्षाने घ्यावेत.
- Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ सुरू झाल्यापासून पाच वर्षानंतर योजनेचे मूल्यमापन करून योजना पुढे सुरू ठेवण्याबाबत अथवा सुधारणे बाबतचे निर्णय घेण्यात येणार आहे.
अ.क्र. | टप्पा | पात्रता | लाभाची रक्कम |
१ . | पहिला टप्पा | मुलींच्या जन्मांतर | ५,०००/- रुपये |
२. | दूसरा टप्पा | इयत्ता पहिली मध्ये | ६,०००/- रुपये |
३. | तिसरा टप्पा | इयत्ता सातवी मध्ये | ७,०००/- रुपये |
४. | चौथा टप्पा | इयत्ता अकरावी मध्ये | ८,०००/- रुपये |
५. | पाचवा टप्पा | मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर | ७५,०००/- रुपये |
महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्याचा Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ या योजनेमध्ये सरकारकडून मुलींना खूप मोठे योगदान मिळणार आहे. Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४योजनेमधून मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे. लेक लाडकी योजनेमुळे महाराष्ट्रातील मुलींचे जन्म प्रमाणात वाढ काराने व मृत्यू प्रमाणात घट करणे हा या योजनेचा मुख्य हेतू असणार आहे, Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ योनेबद्दल दिलेली ही पूर्ण माहिती, पात्रता/ अपात्रता बद्दलची माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करून ही योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून कोणतेही गरजू कुटुंब, व्यक्ती या लाभापासून वंचित राहणार नाही . अशाच सरकारी योजना जाणून घेण्यासाठी आणि त्यांचा लाभ करून घेण्यासाठी आमचा सरकारी योजना २०२४ व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा–https://chat.whatsapp.com/G0DyfdwhOuS4ewvEY3sov1
लेक लाडकी योजनेचा अर्ज डाउनलोड करण्यासाठी लिंक ला क्लिक करा – https://yojanaworld.in/wp-content/uploads/2024/07/Maharashtra-Lek-Ladki-Scheme-Application-Form.pdf
हे पण पहा- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा-https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-mazi-ladaki-bahin-yojana-2024/#more-233
हे पण पहा- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-tirth-darshan-yoajana-2024/
हे पण पहा- मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-yuva-karya-prashikshan-yojana/#more-291
हे पण पहा- मोदी आवास घरकुल योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/modi-awas-gharkul-yojana-2024/#more-338
हे पण पहा- मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा–https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-vayoshri-yojana-2024/#more-319