Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 I
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ I Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 चा i महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते २२ जून २०२४ रोजी जी. आर. पास करण्यात आला. ही योजना महाराष्ट्रामधील गरजू महिलांना एक मदतीचा हाथ मिळवा यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांची रोजगारी टक्केवारी बघता खूपच कमी आहे. याचसंदर्भातल्या बाबी विचारात घेत महिलांच्या आर्थिक तसेच आरोग्य विषयक गोष्टीमद्धे सुधारणा करणेंसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अमलात आणलेली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ I Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 या योजनेच्या माध्यमातून आर्थिक परिस्थिति बिकट असणाऱ्या महिलांना दरमहा म्हणजेच प्रत्येक महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत जे थेट महिलांच्या बँक खात्या मध्ये जमा करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या बाबतीत घेतलेला हा भविष्यामध्ये खूप मोठा निर्णय ठरणार आहे. उत्तर प्रदेश मध्ये सगळ्यात प्रथम या योजनेची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर या योजनेची लोकप्रियता बघता महाराष्ट्र सरकारने सुद्धा आपल्या लाडक्या बहिणींसाठी ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये मध्ये सुरू करण्याचा योग्य निर्णय घेतला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ I Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 या नावाने राज्य सरकारने आपल्या बजेट मधून अस्तित्वात आणली आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये ज्या महिला ह्या वयोमर्यादा २१ पासून ते वयवर्ष ६० पर्यंत आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेचा लाभ उचलण्यासाठी या वयो गटातील महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद पहायला मिळत आहे. या योजनेचा लाभ विवाहित महिला, विधवा महिला, घटस्फोटित महिला आणि मुख्यतः निराधार महिला घेऊ शकतात. ही योजना अशा महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबासाठी राज्य सरकारने ही योजना अंमलात आणलेली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ I Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे;
- लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच (२.५) लाखांपेक्षा कमी असं गरजेच आहे.
- ही योजना महाराष्ट्र राज्य शासनाची असलेने महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे गरजेच आहे.
- योजना लाभार्थी महिला ही वयवर्ष २१ ते वयवर्ष ६० या गटातील असावी.
- मुख्यतः विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला लाभार्थी.
- लाभार्थी महिलेच वैयक्तिक बँक अकाऊंट असणे गरजेच.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ I Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 योजनेमध्ये कोणाला अपात्र ठरवले जाईल:-
- लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी नसेल तर तो लाभार्थी अपात्र ठरवलं जाईल.
- ज्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न हे अडीच (2.5) लाखांपेक्षा जास्ती आहे.
- ज्यांच्या कुटुंबामध्ये आयकरदाता आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य ही नियमित म्हणजेच कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, भारत सरकार तसेच राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्ती नंतर निवृत्तीवेतन घेत आहेत.
- कुटुंबातील महिलेने इतर शासकीय योजना मधून १५०० रूपयाच्या वर लाभ घेतला असेल तर त्या महिलेस अपात्र ठरावले जाईल.
- लाभार्थीच्या कुटुंबातील जर कोणी विद्यमान/ माजी आमदार किंवा खासदार असतील तर त्या लाभार्थी महिलेला या योजनेचा लाभ घेत येणार नाही.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या उपक्रमाचे अध्यक्ष संचालक सदस्य आहेत.
- ज्या लाभार्थीच्या कुटुंबामधल्या सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहन आहे
(ट्रॅक्टर वगळता) त्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ I Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 मध्ये कोणते लाभार्थी पात्र व कोणते अपात्र ठरवले जातील या निकशासाठीचे नियम हे आवश्यक असल्यास शासनाकडून बदलण्यात येतील.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ I Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 मध्ये आवश्यक कागदपत्रांची यादी :-
- योजनेच्या लाभासाठी योजना लाभार्थ्यांनी ऑनलाइन फॉर्म भरणे गरजेचे आहे.
- लाभार्थी महिलेचे आधार कार्ड.
- महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला किंवा महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र.
- सक्षम प्राधिकारी यांचेकडून घेतलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला जो अडीच लाखांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
- पासपोर्ट साईज फोटो.
- रेशन कार्ड.
- बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ I Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 योजनेच्या लाभार्थ्यांची निवड कशी केली जाईल :–
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची पात्रता ही अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका तसेच ग्रामसेवक, ग्रामपंचायत वार्ड अधिकारी यांनी खातरजमा/तपासणी करून आणि ऑनलाइन पडताळणी करून लाभार्थ्यांचा अर्ज हा निर्णायक अधिकाऱ्यांकडे जमा केला जाईल. निर्णायक अधिकारी ही संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी असणार आहेत. अंतिम मंजुरी देण्याचे काम हे संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती करणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ I Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024
ची सविस्तर माहिती;-
- ऑनलाइन अर्ज
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ I Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 लाभार्थ्यांनी पोर्टल वर जाऊन ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ I Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 योजने मधील नियमांना पात्र ठरलेल्या महिलांना ऑनलाइन अर्ज करता येईल.
- ज्या महिलांना ऑनलाइन फॉर्म भरणे शक्य होत नसेल तर ते अंगणवाडी किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय समोर जाऊन ऑफलाइन फॉर्म भरू शकतात.
- ऑफलाइन भरलेला फॉर्म अंगणवाडी आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातून विशेष नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांकडून ऑनलाईन भरण्यात येईल त्याची योग्य ती पावती महिलांना दिली जाईल.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ I Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 योजनेचे संपूर्ण फॉर्म हे निशुल्क भरले जातील त्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागणार नाहीत.
- ऑनलाइन अर्ज भरताना किंवा ऑफलाईन अर्ज भरताना महिलेने तिथे स्वतः उपस्थित राहणे अनिवार्य आहे जेणेकरून महिलेचा थेट फोटो व ई केवायसी करता येईल यासाठी महिलेच्या कुटुंबातील पूर्ण ओळखपत्र रेशन कार्ड तसेच आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
- प्रथम टप्प्यातील यादी जाहीर करण्यात येईल;-
महिलांनी भरलेल्या फॉर्म मधील पात्र ठरलेल्या महिलांची यादी पोर्टलवर किंवा ॲपवर तसेच ऑफलाइन पद्धतीने अंगणवाडीमध्ये जाहीर करण्यात येईल.
- पात्र महिलांच्या यादी मधील हरकत :-
पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या यादींमध्ये काही तक्रार किंवा हरकत असल्यास ऑनलाईन पोर्टलमध्ये आपण ती नोंद करू शकतो तसेच ऑफलाइन पद्धतीने अंगणवाडी किंवा बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कडे आपण तक्रार करू शकतो आपल्या ऑफलाइन तक्रारीची नोंद ही नंतर ऑनलाईन पद्धतीने अपलोड केली जाईल महत्त्वाचे म्हणजे लाभार्थ्यांची यादी लागल्यानंतर पाच दिवसांच्या आत मध्ये या तक्रारी येणे आवश्यक आहे त्यानंतर येणारी तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही याची सर्व महिलांनी नोंद घ्यावी.
- अंतिम टप्प्यातील यादी जाहीर करण्यात येईल;-
प्रथम टप्प्यातील यादीतील तक्रारी आणि हरकती यांचे निवारण करून त्यामधील पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. अंतिम यादी ही पोर्टलवर आणि अंगणवाडीमध्ये स्वतंत्र जाहीर करण्यात येईल, ज्या लाभार्थ्यांचे अंतिम टप्प्यांमध्ये नाव येईल ती मृत झाल्यास लाभार्थ्यांच्या यादीतून ते नाव काढून टाकले जाईल.
- योजनेतील लाभार्थ्यांच्या रकमेचे वाटप;-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ I Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 या योजनेमध्ये लाभार्थी ठरलेल्या महिलांना त्यांची रक्कम त्यांच्या आधारला लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल. ही रक्कम जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय कडून केली जाईल.
टीप ;- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ I Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 ही सोयीस्कररित्या व कोणताही भ्रष्टाचार न करता पार करता यावी यासाठी कार्यपद्धतीमध्ये नवीन आवश्यक बदल करण्याचे अधिकार हे माननीय मुख्यमंत्री, महिला व बाल विकास कार्यालयाकडे राखीव राहतील, तसेच या योजनेचा गैरवापर होऊ नये यासाठी माननीय मुख्यमंत्री आणि महिला व बालविकास कार्यालय कडून दर तीन महिन्यातून याचा आढावा घेतला जाईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ I Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 ही योजना महिलांच्या आर्थिकरित्या सबलीकरणासाठी व कुटुंबामध्ये त्यांच्याकडून हातभार लागण्यासाठी सुरू केलेली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांच्या पात्र नियमांमध्ये बसणाऱ्या महिलांनी या योजनेचा वापर करून स्वतःची आर्थिक स्थिती सुधारणे गरजेचे आहे, हेच धोरण लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्री यांनी या योजनेची स्थापना केली आहे. बाहेरच्या राज्यांमध्ये खूप सार्या योजना सुरू आहेत अशाच योजनेचा महाराष्ट्रा मधील जनतेला लाभ व्हावा या दृष्टीने योजना सुरू केली आहे, तरी महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेने यामध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. तसेच आपल्या आसपासच्या महिलांना याबाबत जागृत करून ज्या महिलांना खरंच या योजनेची गरज आहे त्यांना याबाबत जागृत करणे महत्त्वाचे आहे.
योजनेचा कालावधी;-
अ. क्र. | अनुक्रमणिका | दिनांक |
१ | अर्ज भरण्याची सुरुवात दिनांक | १ जुलै, २०२४ |
२ | अर्ज भरण्याचे अंतिम दिनांक | १५ जुलै, २०२४ |
३ | प्रथम टप्प्यातील यादी जाहीर | १६ जुलै, २०२४ |
४ | प्रथम टप्प्यातील यादीतील हरकती व तक्रारी नोंदवण्याचे दिनांक | १६ जुलै, २०२४ ते २० जुलै, २०२४ |
५ | हरकती व तक्रारी निवारण करण्याची तारीख | २० जुलै, २०२४ ते ३० जुलै, २०२४ |
६ | शेवटच्या टप्प्यातील यादी जाहीर करण्याचे दिनांक | १ ऑगस्ट २०२४ |
७ | लाभार्थ्यांच्या बँकेमध्ये इ केवायसी करण्याची दिनांक | १० ऑगस्ट २०२४ |
८ | लाभार्थ्यांना योजनेच्या निधीचे वाटप | १४ ऑगस्ट २०२४ |
९ | योजनेचा निधी बँकेमध्ये जमा करण्याची तारीख | प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपर्यंत |
वरील माहिती ही शासनाने जाहीर केलेल्या जी आर मधून घेतलेली आहे. महाराष्ट्र राज्यामधील प्रत्येक महिलेने या योजनेचा लाभ घेणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://drive.google.com/file/d/1dlFUm9_wuC_HAMTcZhjzqV8HnONaP6hN/view?pli=1
ही योजना ज्या महिलांना खरंच गरज आहे, त्यांना खूप मोठा आधार ठरणारी आहे. या योजनेच्या लाभा मधून ते आपल्या कुटुंबाला हातभार लाऊ शकतात, तसेच आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतात, आणि हेच या योजनेचा मुख्य हेतु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील पूर्ण दिलेले माहिती व्यवस्थित वाचून लवकरात लवकर या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज दाखल करावा. जेणेकरून आपल्याला महाराष्ट्र राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ I Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 या योजनेच्या लाभापासून आपण वंचित राहणार नाही. ही संपूर्ण माहिती तुमच्या जवळच्या लोकांना आणि गरजू महिलांना देऊन त्यांना ही लाभ मिळण्यासाठी मदत करावी आणि योग्य ते मार्गदर्शन करावे.
About us –
सरकार आपल्यासाठी अशाच खूप योजना वेळोवेळी अंमलात आणत असत, पण त्यातील काहीच योजना ह्या आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आपल्याला त्याचा लाभ घेता येतो. अशाच योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा. जेणेकरून पुढच्या वेळेला सरकारने जाहीर केलेल्या कोणत्याही योजनेच्या लाभा पासून तुम्ही वंचित राहणार नाही. सरकारने सुरू केलेल्या योजना आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत असे म्हणणे चुकीचे आहे, तर त्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही हे म्हणणे बरोबर आहे. आमच्या पेजवर अशाच योजनेची संपूर्ण माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.
या ब्लॉग वर दिलेली माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांद्वारे घेण्यात आलेली आहे व अगदी सहज सोप्या भाषेत आपल्या या ब्लॉग मध्ये मांडण्याच प्रयत्न केला आहे.
या वेबसाइट वरील माहिती आवडली असल्यास आपल्या मित्र परिवार तसेच नतेवाईकांसोबत नक्की शेयर करा आणि यांचा What’s App ग्रुप ला जॉइन व्हा. What’s App ग्रुप ला जॉइन होण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा –https://chat.whatsapp.com/G0DyfdwhOuS4ewvEY3sov1.
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-yuva-karya-prashikshan-yojana/#more-291
मुख्यमंत्री लेक लाडकी योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/lek-ladaki-yojana-2024/
हे पण पहा- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-tirth-darshan-yoajana-2024/
हे पण पहा- मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा–https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-vayoshri-yojana-2024/#more-319
हे पण पहा- मोदी आवास घरकुल योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा–https://blogwithsagarmane.com/modi-awas-gharkul-yojana-2024/#more-338