Mukhyamantri Tirth Darshan Yoajana 2024 I मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सविस्तर माहिती;-
१. Mukhyamantri Tirth Darshan Yoajana 2024 I मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा मुख्य हेतू;-
महाराष्ट्र राज्यातील विविध धर्म आणि पंथामधील जेष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे हा या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना चा मुख्य हेतू आहे.
२. Mukhyamantri Tirth Darshan Yoajana 2024 I मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ-
Mukhyamantri Tirth Darshan Yoajana 2024 I मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना मध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश केला गेला आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना मध्ये ज्या तीर्थस्थळांना मान्यता दिली आहे, त्यांची यादी ही खाली दिली गेली आहे. या यादीमधील स्थळे कमी होऊ शकतात किंवा यांच्या संख्येमध्ये वाढ होऊ शकतात. या योजनेअंतर्गत ठरलेल्या यादी मधील तीर्थस्थळांपैकी एका तीर्थस्थळाला पात्र व्यक्तीस भेट देता येते. पात्र व्यक्ती या योजनेचा लाभ फक्त एका वेळेसाठीच घेऊ शकते. तीर्थस्थळाला भेट देण्याकरिता प्रवासाची खर्चाची कमाल मर्यादा ही प्रति व्यक्ती ३०,०००/- रुपये इतके राहील. यामध्ये प्रवास, भोजन, निवास इत्यादी सर्व बाबी समाविष्ट केल्या जातील.
३. Mukhyamantri Tirth Darshan Yoajana 2024 I मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे लाभार्थी;-
महाराष्ट्र राज्यातील वयवर्ष 60 व त्यावरील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक असतील.
४. Mukhyamantri Tirth Darshan Yoajana 2024 I मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता;-
- लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे.
- वय वर्ष ६० व त्यावरील जेष्ठ नागरिक असणे गरजेचे आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच(२.५०) लाखांपेक्षा जास्ती नसावे.
५. Mukhyamantri Tirth Darshan Yoajana 2024 I मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभार्थ्यांची अपात्रता;-
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे असे लोक अपात्र राहतील. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत. तसेच जे सदस्य सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत असे सदस्य हे या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत, पण अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेले कॉन्ट्रॅक्ट बेस कंत्राटवरचे कर्मचारी, स्वयंसेवी कामगार हे पात्र ठरतील.
- ज्यांच्या कुटुंबामध्ये विद्यमान खासदार किंवा आमदार तसेच माजी खासदार किंवा आमदार असतील
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही उपक्रमामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य असतील असे लोक अपात्र ठरतील.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहन आहे, (ट्रॅक्टर वगळता) ते अपात्र ठरतील.
- प्रवासासाठी शारीरिक व माणसिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचे संसर्गजन्य रोग जसे की टीबी, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, कोरोनरी अपुरेपणा, कोरोनरी थरोंबोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी असल्यास अपात्र ठरवले जातील.
- अर्ज भरल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर, ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि सदर प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून पंधरा दिवसापेक्षा जुने नसावे.
- जे अर्जदार मागील वर्षांमध्ये पात्र ठरले होते, परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी तो प्रवास पूर्ण केला नाही, अशा माजी अर्जदारांना देखील योजनेत अपात्र ठरवले जाईल.
- जर असे आढळून आले की अर्जदार खोटी माहिती देऊन किंवा काही तथ्य लपवून या योजनेचा लाभ घेत असेल, तर त्या अर्जदाराला अपात्र ठरवले जाईल व या योजनेच्या लाभांपासून वंचित ठेवले जाईल.
- सदर योजनेची पात्रता व अपात्रतेच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.
६. Mukhyamantri Tirth Darshan Yoajana 2024 I मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे;-
- Mukhyamantri Tirth Darshan Yoajana 2024 I मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक .
- लाभार्थ्यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी दाखला किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला असणे आवश्यक आहे. (लाभार्थ्यांचे प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी लाभार्थ्यांचे ओळखपत्र पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड/ मतदार ओळखपत्र/ शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/ जन्म दाखला असल्यास ते ग्राह्य धरण्यात येईल.)
- पिवळे/ केसरी रेशन कार्ड चालेल किंवा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबप्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला. (वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा कमी असणे अनिवार्य आहे.)
- वैद्यकीय प्रमाणपत्र.
- पासपोर्ट साईजचा फोटो.
- जवळच्या नातेवाईकांचा मोबाईल नंबर.
- Mukhyamantri Tirth Darshan Yoajana 2024 I मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतची हमीपत्र.
७. बस प्रवास एजन्सी किंवा रेल्वे प्रवास एजन्सी तसेच टुरिस्ट कंपन्यांची निवड;-
Mukhyamantri Tirth Darshan Yoajana 2024 I मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत बस प्रवासाचे आयोजन करणाऱ्या अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासात साठी IRCTC समकक्ष अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांची निवड विहित निविदा (Prescribed tender) प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहे.
८. Mukhyamantri Tirth Darshan Yoajana 2024 I मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभार्थ्यांची निवड;-
प्रवाशांची निवड ही जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे केली जाईल. प्रत्येक जिल्ह्यासाठी त्याच्या लोकसंख्येवर आधारित असा जिल्हास्तरीय कोटा निश्चित केला जाईल.
- जिल्हास्तरीय आधारित निश्चित कोट्याच्या पेक्षा जास्ती अर्ज आले, तर अर्जांच्या उपलब्धते वर आधारित लॉटरी (संगणकृत ड्रॉ) द्वारे लाभार्थी प्रवाशांचे निवड करण्यात येईल.
- कोट्यातील १००% अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी देखील तयार करण्यात येईल. निवडलेला प्रवासी प्रवासाला न केल्यास प्रतीक्षा यादीतील समाविष्ट असलेले व्यक्तीला प्रवासास पाठवता येईल.
- Mukhyamantri Tirth Darshan Yoajana 2024 I मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी निवडलेले प्रवासी किंवा प्रतीक्षा यादी ही जिल्हाधिकारी कार्यालय फलकावर तसेच समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि योग्य वाटेल अशा इतर माध्यमातून प्रसारित केली जाईल.
- Mukhyamantri Tirth Darshan Yoajana 2024 I मुख्यमंत्री तीर्थ योजने मधून लाभार्थी म्हणून असलेले प्रवासी फक्त प्रवास करू शकतात. त्यांच्याबरोबर कोणत्याही इतर व्यक्तीला सोबत घेऊन जाता येणार नाही.
- अर्ज करणारे पती-पत्नी स्वतंत्रपणे अर्ज केला असतील त्यामध्ये एकाची निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराची निवड झाली नसेल तर आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे त्यांना किंवा तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतात.
९. Mukhyamantri Tirth Darshan Yoajana 2024 I मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या प्रवासाची प्रक्रिया;-
- जिल्हास्तरीय समितीने निवडून दिलेल्या लाभार्थी प्रवाशांची यादी ही आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडे सुपूर्द केली जाईल.
- निवडलेले प्रवाशांची यादी प्रवासासाठी अधिकृत टुरिस्ट कंपनी किंवा एजन्सीला देण्यात येईल.
- निवडलेले अधिकृत एजन्सी /टुरिस्ट कंपनी लाभार्थी प्रवाशांची असण्याची सुव्यवस्था करेल.
- लाभार्थी प्रवाशांना प्रवासासाठी आवश्यक सुविधा त्या सुविधांपैकी कोणत्या सुविधा लाभार्थी प्रवाशांना देण्यात याव्यात याचा निर्णय पूर्णपणे राज्य शासनाकडे राहील.
- लाभार्थी प्रवाशांना प्रवासासाठी नियोजित स्थळी हे आपल्या स्वखर्चाने पोहोचावं लागेल.
- रेल्वे/ बसने प्रवास;-
- जिल्हास्तरावर निवड करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे प्रवाशांची सुरक्षा आणि आरोग्य बाबतची व्यवस्था सुनिश्चित केली जाईल.
- प्रवास सुरू झाल्यानंतर कोणत्याही प्रवाशाला प्रवास मधूनच सोडून जायचं असेल, तर तशी कोणतीही सुविधा सरकारकडून दिली जाणार नाही, विशेष परिस्थितीत प्रवास मध्यमार्गे सोडण्याचे आवश्यक असल्यास उपस्थित मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली त्यांची परवानगी घेऊन प्रवासी स्वखर्चाने परतीचा प्रवास करू शकतात.
१०. Mukhyamantri Tirth Darshan Yoajana 2024 I मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या प्रवाशांचा गट;-
या योजनेच्या अंतर्गत हा प्रवास केवळ एकत्रितपणे आयोजित केला जाईल. प्रवाशांचा हा गट राज्य शासन किंवा शासनाच्या अधिकृत केलेल्या प्राधिकरण द्वारे निश्चित केला जाईल. शासनाने नमूद केलेल्या किमान प्रवासी संख्या उपलब्ध झाल्यावरच कोणत्याही तीर्थ दर्शनासाठी प्रवास सुरू केला जाईल.
११. Mukhyamantri Tirth Darshan Yoajana 2024 I मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे लाभार्थी प्रवासी सोडून इतर लोकांच्या प्रवासावर बंदी;-
Mukhyamantri Tirth Darshan Yoajana 2024 I मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या अंतर्गत निवड झालेल्या प्रवासी व्यक्तीलाच प्रवास करता येणार आहे. प्रवासाचा खर्च देण्याची तयारी जरी असेल, तरीही दुसऱ्या व्यक्तींना लाभार्थी प्रवाशाच्या सोबत प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही. निवड झालेला प्रवासी हाच ट्रेन आणि बस मध्ये प्रवास करतील आणि प्रत्येक सीटवर फक्त एकच व्यक्ती प्रवास करू शकतो.
१२. अतिरिक्त खर्च;-
Mukhyamantri Tirth Darshan Yoajana 2024 I मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या अंतर्गत निवड झालेल्या प्रवासींना जर देवस्थान व विभागाने ठरवून दिलेल्या सुविधा सोडून व्यतिरिक्त इतर सुविधा घ्यायचे असतील, तर त्यासाठी त्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.
१३. प्रवासादरम्यान लाभार्थी प्रवाशांनी पाळावयाचे नियम;-
- प्रवाशांनी स्वतःबरोबर कोणतेही ज्वलनशील किंवा मादक पदार्थ कोणत्याही स्वरूपात वाहून नेण्यास बंदी राहील.
- राज्याची आणि देशाची प्रतिमा खराब होणार नाही अशा रीतीने यात्रेकरूंनी यात्रेच्या प्रतिष्ठेनुसार वागावे.
- प्रवाशाने त्यांच्या नियुक्ती केलेल्या अधिकारी, मार्गदर्शकाच्या सूचनांचे पालन करावे.
- जिल्हास्तरीय कमिटीने तयार केलेल्या आचारसंहितेच्या पालन करण्याच्या, इराद्याबाबत प्रवाशांकडून हमीपत्र घेतले जाईल.
- प्रवाशांनी विभागाच्या नियमांचे पालन करावे. त्याचबरोबर इतर प्रवाशांना आपल्यामुळे गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी.
- साधारणपणे ट्रेनमध्ये झोपण्याची वेळ रात्री १०.०० ते सकाळी ०६.०० पर्यंत असेल आणि प्रवासी त्यांच्या संबंधित बर्थ वर झोपतील. विभागीय गरजेनुसार त्यावेळी काही बदल केले जाऊ शकतात.
१४. Mukhyamantri Tirth Darshan Yoajana 2024 I मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया;-
Mukhyamantri Tirth Darshan Yoajana 2024 I मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲप द्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात.
- पात्र जेष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
- ज्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करता येत नसेल त्यांना अर्ज भरण्याची सुविधा ही सेतू केंद्रामध्ये उपलब्ध केली आहे.
- अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही निशुल्क राहील.
- अर्ज करणाऱ्या अर्जदाराने स्वतः तिथे उपलब्ध राहणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल, आणि E-KYC करता येईल. यासाठी अर्जदाराने खाली लिहिलेली माहिती आणणे आवश्यक आहे.
- कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र.
- स्वतःचे आधार कार्ड.
१५. Mukhyamantri Tirth Darshan Yoajana 2024 I मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या तात्पुरत्या यादीचे प्रकाशन;-
अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी ही पोर्टलवर किंवा ॲपवर प्रसिद्ध केली जाईल.
पात्र अंतिम यादीतील अर्जदार जर दुर्दैवाने मयत झाल्यास अर्जदाराचे नाव लाभार्थी यादीतून काढण्यात येईल.
१६. मूळ अर्जदारासह जीवनसाथी/ सहाय्यकाच्या प्रवासासंबंधीच्या सुविधा;-
- ७५ वर्षावरील अर्जदाराला त्याचे जीवनसाथी किंवा सहाय्यकाला असे एकाला कोणालातरी त्याच्यासोबत नेण्याचे परवानगी आहे. परंतु अर्जदाराने अर्जामध्ये असे नमूद करणे अनिवार्य राहील, की त्याचा जीवनसाथी/ सहाय्यक देखील प्रवास करण्यास इच्छुक आहे.
- ७५ वर्षावरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय ६० पेक्षा कमी असले तरीही तो प्रवास करू शकतो.
- प्रवासात सहाय्यक घेण्याची सुविधा तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा अर्जदाराचे वय ७५ पेक्षा जास्त असेल. अर्जदाराचे वय जर ७५ वर्षांपेक्षा कमी असल्यास सहाय्यकांची परवानगी दिली जाणार नाही.
- सोबत प्रवास करत असताना जोडीदार सोबत मदतीस घेण्याची सोय नसेल. जर दोन्ही पती-पत्नीचे वय ७५ वर्षांपेक्षा जास्त असेल आणि अर्जामध्ये तसे नोंद केले असेल, तर तो पाठविला जाऊ शकतो.
- सहाय्यकाचे किमान वय २१ ते कमाल वय ५० वर्षे असावे. एखादा मदतनीस प्रवासात घेतल्यास त्याला देखील त्या प्रकाराच्या सुविधा मिळतील ज्या प्रवाशाला परवानगी आहे. सहाय्यक शारीरिकदृष्ट्या निरोगी व तंदुरुस्त असावा.
- प्रवासी, पती- पत्नी आणि सहाय्यकांनी प्रवाशी संबंधित सर्व नियमांचे पालन करणे गरजेच आहे.
भारतातील तीर्थक्षेत्र यादी
अ. क्र. | मंदिराचे नाव | स्थान |
1 | वैष्णवदेवी मंदिर, कटरा | जम्मू आणि काश्मीर |
2 | अमरनाथ गुहा, मंदिर | जम्मू आणि काश्मीर |
3 | सुवर्ण मंदिर, अमृतसर | पंजाब |
4 | अक्षरधाम मंदिर | दिल्ली |
5 | श्री दिगंबर जैन लाल मंदिर | दिल्ली |
6 | श्री लक्ष्मीनारायण मंदिर | दिल्ली |
7 | श्री बद्रीनाथ मंदिर | चमोली,उत्तराखंड |
8 | श्री गंगोत्री मंदिर, उत्तरकाशी | उत्तराखंड |
9 | श्री केदारनाथ मंदिर, रुद्रप्रयाग | उत्तराखंड |
10 | श्री नीलकंठ महादेव मंदिर, ऋषिकेश | उत्तराखंड |
11 | श्री यमुनोत्री मंदिर, उत्तरकाशी | उत्तराखंड |
12 | श्री बैद्यनाथ धाम, देवघर | झारखंड |
13 | श्री काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसी | उत्तर प्रदेश |
14 | श्री इस्कॉन मंदिर, वृंदावन | उत्तर प्रदेश |
15 | श्रीराम मंदिर, आयोध्या | उत्तर प्रदेश |
16 | श्री सूर्य मंदिर, कोणार्क | उत्तर प्रदेश |
17 | श्री जगन्नाथ मंदिर, पुरी | उत्तर प्रदेश |
18 | स्त्रीलिंगराज मंदिर, भुवनेश्वर | उत्तर प्रदेश |
19 | श्री मुक्तेश्वर मंदिर, भुवनेश्वर | उत्तर प्रदेश |
20 | श्री कामाख्यादेवी मंदिर, गुवाघाटी | उत्तर प्रदेश |
21 | श्री महाबोधीमंदिर, गया | बिहार |
22 | श्री रणकपुर मंदिर, पाली | राजस्थान |
23 | अजमेर दर्गा, राजस्थान | राजस्थान |
24 | श्री सोमनाथ मंदिर, वेरावळ | गुजरात |
25 | श्री द्वारकाधीश मंदिर, द्वारका | गुजरात |
26 | श्री नागेश्वर मंदिर, द्वारका | गुजरात |
27 | सांची स्तूप, सांची | मध्य प्रदेश |
228 | खजुराहो मंदिर, खजुराहो | मध्य प्रदेश |
29 | श्री महाकालेश्वर मंदिर, उज्जैन | मध्य प्रदेश |
30 | श्री ओंकारेश्वर मंदिर आणि ममलेश्वर मंदिर खंडवा आणि ब्रह्मपुरी | मध्य प्रदेश |
31 | श्री रंगनाथस्वामी मंदिर, श्रीरंगम | कर्नाटक |
32 | श्री गोमटेश्वर मंदिर, श्रवणबेळगोळ | कर्नाटक |
33 | श्री वीरूपाक्ष मंदिर, हम्पी | कर्नाटक |
34 | श्री चेन्नकेशव मंदिर, बेलूर | कर्नाटक |
35 | श्री अन्नपूर्णेश्वरी मंदिर, होरानाडू | कर्नाटक |
36 | श्री महाबळेश्वर मंदिर, गोकर्ण | कर्नाटक |
37 | श्री भूतनाथ मंदिर, बदामी | कर्नाटक |
38 | श्री मरुडेश्वर मंदिर, मरुडेश्वर | कर्नाटक |
39 | आयहोल दुर्गा मंदिर, आयहोल | कर्नाटक |
40 | श्रीकृष्ण मंदिर, उडपी | कर्नाटक |
41 | वीर नारायण मंदिर, बेलावडी | कर्नाटक |
42 | तिरुपती बालाजी मंदिर, तिरूमला | कर्नाटक |
43 | श्री मल्लिकार्जुन मंदिर, श्रीशैलम | आंध्र प्रदेश |
44 | श्री बृहद्दी श्रय मंदिर, तंजावर | आंध्र प्रदेश |
45 | श्री मीनाक्षी मंदिर, मदुराई | तामिळनाडू |
46 | श्री रामनाथस्वामी मंदिर, रामेश्वरम | तामिळनाडू |
47 | श्री कांचीपुरम मंदिर, कांचीपुरम | तामिळनाडू |
48 | श्री रंगनाथस्वामी मंदिर, त्रिची | तामिळनाडू |
49 | श्री अरुणाळेश्वर मंदिर, तिरुवन्नामलाई | तामिळनाडू |
50 | कैलसनाथ मंदिर, कांचीपुरम | तामिळनाडू |
51 | एकांबरेश्वर मंदिर, कांचीपुरम | तामिळनाडू |
52 | सारंगपाणीमंदिर कुंभकोणम | तामिळनाडू |
53 | किनारा मंदिर, महाबलीपुरम | तामिळनाडू |
54 | मुरगन मंदिर, तिरूचेंदूर | तामिळनाडू |
55 | श्री पद्मनाथस्वामी मंदिर, तिरुवनंतपुरम | केरळ |
56 | गुरुवायूर मंदिर, गुरुवायूर | केरळ |
57 | वडकुन्हाथन मंदिर, त्रिशूर | केरळ |
58 | पार्थसारथी मंदिर, अरणमुला | केरळ |
59 | शबरीमाना मंदिर, पथनतिट्टा | केरळ |
60 | अट्टाकल भगवती मंदिर, तिरुवनंतपुरम | केरळ |
61 | श्रीकृष्ण मंदिर, गुरुवायुर | केरळ |
62 | थिरुनेल्ली मंदिर, वायनाड | केरळ |
63 | वैकोम महादेव मंदिर | केरळ |
64 | तिरुवल्ला मंदिर, तिरुमल्ला | केरळ |
65 | शिवगिरि मंदिर, वर्कला | केरळ |
66 | श्री सम्मेद शिखर्जी मंदिर (गिरिडीह) | झारखंड |
67 | शत्रुनजय हिल | गुजरात |
68 | गिरनार | गुजरात |
69 | देवगड़ | उत्तर प्रदेश |
70 | पावापुरी | बिहार |
71 | रणकपुर | राजस्थान |
72 | दिलवाड़ा टेंपल | राजस्थान |
73 | उदयगिरि | मध्य प्रदेश |
महाराष्ट्रामधील तीर्थस्थळाची यादी
अ . क्र | तीर्थक्षेत्राचे नाव | जिल्हा |
1 | सिद्धिविनायक मंदिर | मुंबई |
2 | महालक्ष्मी मंदिर | मुंबई |
3 | चैत्यभूमी दादर | मुंबई |
4 | माउंट मेरी चर्च (वांद्रे) | मुंबई |
5 | मुंबादेवी मंदिर | मुंबई |
6 | वाळकेश्वर मंदिर मलबार हिल | मुंबई |
7 | विश्व विपश्यना प्यायगोडा गोराई | मुंबई |
8 | चर्च ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थ, कॉवेल | मुंबई |
9 | सेंड अँडरेयू चर्च | मुंबई |
10 | सेंट जॉन द बॅपटिस्ट चर्च, सिपज्य औद्योगिक क्षेत्र अंधेरी | मुंबई |
11 | सेंट जॉन द बॅपटिस्ट चर्च, मरोळ | मुंबई |
12 | गोदीजी पार्श्वंत मंदिर | मुंबई |
13 | नेसेस एलियाहू सेनेगॉग फोर्ट | मुंबई |
14 | शर हरहमीम सिनेगौग, मज्जिद भंडार | मुंबई |
15 | म्यागेन डेव्हिड सिनेगॉग, भायखळा | मुंबई |
16 | सेंट जॉन द बॅपटिस्ट चर्च | ठाणे |
17 | अग्यारी / अग्निमंदिर | ठाणे |
18 | मयुरेश्वर मंदिर, मोरगाव | पुणे |
19 | चिंतामणी मंदिर, थेऊर | पुणे |
20 | गिरिजात्मक मंदिर, लेण्याद्री | पुणे |
21 | महागणपती मंदिर, रांजणगाव | पुणे |
22 | खंडोबा मंदिर, जेजुरी | पुणे |
23 | संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर, आळंदी | पुणे |
24 | भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर खेडा तालुका | पुणे |
25 | संत तुकाराम महाराज मंदिर, देहू | पुणे |
26 | संत चोखामेळा मंदिर, पंढरपूर | सोलापूर |
27 | संत सावता माळी मंदिर, अरण तालुका माढा | सोलापूर |
28 | विठोबा मंदिर, पंढरपूर | सोलापूर |
29 | शिखर शिंगणापूर | सातारा |
30 | महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर | कोल्हापूर |
31 | ज्योतिबा मंदिर, कोल्हापूर | कोल्हापूर |
32 | जैन मंदिर, कुंभोज | कोल्हापूर |
33 | रेणुका देवी मंदिर, माहूर | नांदेड |
34 | गुरुगोविंद सिंग समाधी हुजूर साहेब, नांदेड | नांदेड |
35 | खंडोबा मंदिर, मालेगाव | नांदेड |
36 | श्री संत नामदेव महाराज देवस्थान उंब्रज तालुका कंधार | नांदेड |
37 | तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर | धाराशिव |
38 | संत एकनाथ समाधी, पैठण | छत्रपती सांभाजीनगर |
39 | घृशनेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, वेरूळ | छत्रपती सांभाजीनगर |
40 | जैन स्मारके एलोरा, लेणी | छत्रपती सांभाजीनगर |
41 | विघ्नेश्वर मंदिर, ओझर | नाशिक |
42 | संत निवृत्तीनाथ समाधी त्र्यंबकेश्वर जवळ | नाशिक |
43 | त्र्यंबकेश्वर शिव मंदिर, त्र्यंबकेश्वर | नाशिक |
44 | मुक्तिधाम | नाशिक |
45 | सप्तशृंगी मंदिर वनी | नाशिक |
46 | काळाराम मंदिर | नाशिक |
47 | जैन मंदिरे मांगीतुंगी | नाशिक |
48 | गजपंत | नाशिक |
49 | संत साईबाबा मंदिर, शिर्डी | अहमदनगर |
50 | सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक | अहमदनगर |
51 | शनीमंदिर, शनिशिंगणापूर | अहमदनगर |
52 | श्री क्षेत्र भगवानगड, पाथर्डी | अहमदनगर |
53 | बल्लाळेश्वर मंदिर, पाली | रायगड |
54 | संत गजानन महाराज मंदिर, शेगाव | बुलढाणा |
55 | एकविरा देवी, कारला | पुणे |
56 | श्री दत्त मंदिर, औदुंबर | सांगली |
57 | केदारेश्वर मंदिर | बीड |
58 | वैजनाथ मंदिर, परळी | बीड |
59 | पावस | रत्नागिरी |
60 | गणपतीपुळे | रत्नागिरी |
61 | मार्लेश्वर मंदिर | रत्नागिरी |
62 | महाकाली देवी | चंद्रपूर |
63 | श्री काळेश्वरी उर्फ काळुबाई मंदिर | सातारा |
64 | अष्टभुज रामटेक | नागपूर |
65 | दीक्षाभूमी | नागपूर |
66 | चिंतामणी कळंब | यवतमाळ |
सारांश;-
भारत देशामध्ये विविध धर्माचे आणि पंतांचे अनुयायी आहेत. अशा विविध धर्मांच्या आणि पंतांच्या तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी ६० वर्ष व त्यावरील वयवर्ष असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने Mukhyamantri Tirth Darshan Yoajana 2024 I मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही योजना अंमलात आणली आहे. भारतामध्ये विविध धर्मांचा प्रचार झाला आहे आणि विविध पंथ उदयास आले आहेत. तसेच त्यांचे संत धर्मगुरू होऊन गेले आहेत. पूर्ण विश्वामध्ये सगळ्यात जास्ती विविध धर्म जर कोणत्या देशात असतील तर तो भारत देश मानला जातो. अशा या भारत देशामध्ये जर संतांची पंढरी म्हटलं तर महाराष्ट्राला प्रथम स्थान मानले जाते. महाराष्ट्रामध्ये विविध जाती आणि धर्मातील संतांचा जन्म झाला. ज्या संतांनी धर्माची परिभाषा बदलून टाकली, आणि माणुसकी हा प्रथम धर्म असून त्याचे पालन व्हावे हे पूर्ण जगासमोर दाखवून दिले. या विचारांना फक्त महाराष्ट्र पुरते मर्यादित न ठेवता त्यांनी हा विचार पूर्ण विश्वामध्ये प्रसारित केला. महाराष्ट्रमध्ये शेकडो अशी मंदिरे धर्मस्थळे आहेत. ज्या धर्मस्थळाने भेट देण्यासाठी जगामधून वेगवेगळ्या धर्मपंथांची माणसे येत असतात.
महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचे आणि भक्तिमार्गाची परंपरा ही शेकडो वर्षापासून लाभली आहे यामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरचे तसेच महाराष्ट्रातले लाखो लोक हे सामाजिक आणि धर्मकार्य हे खूप भक्तीने करत असतात. मुख्यतः यामध्ये वयवर्ष ६० नंतर असणारे नागरिकांचे प्रमाण हे जास्ती आहे आपले दैनंदिन आणि कौटुंबिक कर्तव्य पार पाडून देवतांचे भगवंताचे नामस्मरण आणि चिंतन करत हे लोक आनंदाने आपल्या आयुष्य जगत असतात. हिंदू धर्मामध्ये चारधाम यात्रा, माता वैष्णवी देवी यात्रा, अमरनाथ यात्रा असेच इतर धर्मियांचेही मोठे मोठे धार्मिक स्थळे आहेत. ज्या धार्मिक स्थळांना आपण आयुष्यात एकदा तरी भेट द्यावी अशी या भक्तजनांची अपेक्षा असते. पण बहुतांश ज्येष्ठ नागरिक आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे हे स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. पुण्य कर्म म्हणून त्यांना भक्ती भावाने या ठिकाणी भेट देण्याची इच्छा असते. पण सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे व कोणी सोबत नसल्याने किंवा पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा करण्याचे साध्य होत नाही. या प्रकारची बाब लक्षात घेता प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना त्या तीर्थ स्थळी धर्मस्थळी तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण करून अध्यात्मिक पातळी गाठणे शुकर व्हावे, सोपे व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे वयवर्ष ६० व वय वर्ष 60 च्या वर असतील त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीचे दर्शनाची संधी देण्यासाठी Mukhyamantri Tirth Darshan Yoajana 2024 I मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्याची निर्णय भारत सरकारने घेतला आहे. Mukhyamantri Tirth Darshan Yoajana 2024 I मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना संदर्भातला Gov. GR Download करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा – https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202407141449472222%E2%80%8D….pdf
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा-https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-mazi-ladaki-bahin-yojana-2024/#more-233
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-yuva-karya-prashikshan-yojana/#more-291
मुख्यमंत्री लेक लाडकी योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/lek-ladaki-yojana-2024/
हे पण पहा- मोदी आवास घरकुल योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/modi-awas-gharkul-yojana-2024/#more-338
हे पण पहा- मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा–https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-vayoshri-yojana-2024/#more-319