Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ ची प्रस्तावना-
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ सुरू करण्याचे मुख्य कारण असे की सन २०११ मध्ये जी जनगणना झाली त्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या ही ११.२४ कोटी इतकी आहे. त्यापैकी अत्ताच्या काळात वयवर्ष ६५ वर्षे व त्यावरील अंदाजित एकूण असे १० ते १२ टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यापैकी ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात कोणत्याना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागत असतो. हीच बाब विचारात घेऊन केंद्र शासनाने दारिद्र्य रेषेखालील संबंधित दिव्यांग दुर्बलग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने/ उपकरणे पुरवण्यासाठी योजना अंमलात आणलेली आहे. त्यानुसार अशा शारीरिक सक्षम नसलेल्या जेष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनात आणण्यासाठी Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ सुरू केली गेलेली आहे.जेष्ठ नागरिकांना गतिशीलता, संप्रेषण आणि मोकळेपणाने जीवन जगता यावे, यासाठी उपकरणे प्रदान करून तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार यांच्याद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य तसेच कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवून त्यांच्या वयोमानानुसार अनुकूल समाज निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ ही योजना राज्यात राबवणे बद्दलचा निर्णय घेतला.
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ शासन निर्णय–
राज्यात ज्या व्यक्ती जेष्ठ नागरिक आहेत म्हणजेच वयवर्ष 65 वर्षे व त्यावरील आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगणे सोईस्कर व्हावे आणि त्यांच्या वयानुसार येणाऱ्या अपंगत्वावर तसेच अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने / उपकरणे खरेदी करता यावीत, स्वास्थ्य केंद्र, योग उपचार केंद्र याद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवता यावा. यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ ही योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ या योजनेचे ध्येय व प्रमुख उद्दिष्ट-
महाराष्ट्र राज्यातील ६५ वर्ष व ६५ वर्षांवरील व्यक्तींना/ जेष्ठ नागरिकांना त्यांच्या सामान्य जीवनात येणारे अडचणी जसे की अपंगत्व, अशक्तपणा यावर मात करण्यासाठी/ उपाययोजना करण्यासाठी, तसेच मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी मन स्वास्थ्य केंद्र, योग उपचार केंद्र यांच्याद्वारे प्रशिक्षण व प्रबोधन घेण्यासाठी एक वेळएकरकमी रुपये 3000/- पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधर संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण (DBT) प्रणाली द्वारे प्रदान करण्यात येईल.
हे पण पहा- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा-https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-mazi-ladaki-bahin-yojana-2024/#more-233
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ स्वरूप;-
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ या योजनेअंतर्गत पात्र जेष्ठ नागरिक/ वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता तसेच दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने व उपकरणे इ. खरेदी करता येतील उदा-:
चष्मा |
श्रवण यंत्र |
ट्रायपॉड स्टिक |
व्हील चेअर |
फोल्डिंग वॉकर |
कमोड खुर्ची |
नि-ब्रेस |
लंबर बेल्ट |
सर्वाइकल कॉलर |
तसेच राज्य शासनाद्वारे कार्मिक विभागाद्वारे नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणी करून करण्यात आलेले योग उपचार केंद्र, मनशक्ति केंद्र, मनस्वास्थ्य केंद्र, इ. याच्यामध्ये सहभागी होउ शकतात.
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ निधी वितरण व अर्थसहाय्यक स्वरूप :-
i) महाराष्ट्र राज्य शासनाकडून पात्र जेष्ठ नागरिकांसाठी 100% अर्थसहाय्य उपलब्ध करण्यात येईल.
ii) थेट लाभ वितरण (D.B.T.) प्रणालीद्वारे थेट बैंक खात्यामध्ये(आधार लिंक असने गरजेचे) रुपये ३०००/- च्या मर्यादेत निधी वितरण करण्यात येईल.
iii) शिबिराचे आयोजन करणे.
आरोग्य यंत्रणेचे जाळे हे सार्वजनिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालयांच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण व माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानांतर्गत ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येत आहे. याप्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाचे यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहे.
हे पण पहा- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-tirth-darshan-yoajana-2024/
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ अपेक्षित खर्च ;-
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी, प्रवास, अल्पोपहार, कार्यालयीन खर्च, पात्र लाभार्थीं व त्यांची नोंदणी, दस्तऐवज तपासणी, कागदपत्रे तपासणी करून त्यांना थेट लाभ हा (D.B.T.) प्रक्रिये द्वारे वितरित करण्यात येणार असून प्रमाणपत्र वाटप करण्याकरता प्रति लाभार्थ्याला २०० रुपये अपेक्षित खर्च येणार असल्याचा अंदाज आहे.
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ या योजनेची अंमलबजावणी :-
(i) ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असणारे सहाय्य तसेच विशेष आर्थिक सहाय्य अनुदान थेट लाभ विक्री (D.B.T.) या प्रणाली द्वारे देण्याचे काम करण्याकरता सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग, मंत्रालय, आयुक्त, समाज कल्याण विभाग पुणे आणि जिल्हा स्तरावरील अंमलबजावणी समिती यांचा सहभाग असणार आहे.
ii) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांना Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ च्या अंमलबजावणी यावर नियंत्रण व देखरेख ठेवण्याचे काम सोपावले आहे.
हे पण पहा- मुख्यमंत्री लेक लाडकी योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/lek-ladaki-yojana-2024/
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ या योजनेसाठी राज्य नोडल यंत्रणा :-
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करणे, तसेच त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून घेऊन त्यांची तपासणी करणे, लाभर्थ्यांचे आधार कार्ड माहिती, बँक खाते यांची माहिती एकत्रित करणे ही कामें राज्य नोडल एजेंसी यंत्रणा व सामाजिक उपक्रम संस्था (CPSU) यांच्या माध्यमातून आयुक्त आणि समाजकल्याण पुणे यांच्याद्वारे पार पाडण्यात येईल.या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड योजनेची अंमलबजावणी देखणी करण्याचा उद्देशाने ग्रामीण भागाकरता जिल्हाधिकारी व शहरी भागात आयुक्त, महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखालील पुढील प्रमाणे ठरवण्यात येईल.
अ) महानगरपालिका स्तर:–
अध्यक्ष : | आयुक्त महानगरपालिका |
सदस्य-: | महानगरपालिका, वैद्यकीय अधिकारी तसेच महिला व बालविकास अधिकारी |
सदस्य सचिव-: | सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण |
ब) जिल्हास्तर :-
अध्यक्ष : | जिल्हाधिकारी |
सह अध्यक्ष-: | जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी |
सदस्य-: | जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक सहसंचालक/ समकक्ष अधिकारी महिला व बालविकास |
सदस्य सचिव :- | सहाय्यक आयुक्त समाज कल्याण/ जिल्हा समाज कल्याण अधिकारी |
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ साठी असलेल्या पात्रतेचे निकष :-
- Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ अंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक (ज्यांनी ३१.१२.२०२३ पर्यंत वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेले असतील असे नागरिक पात्र ठरतील.) ६५ वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे अनिवार्य राहील किंवा आधार कार्ड साठी अर्ज केलेला असणे तसेच आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे. जर लाभार्थी व्यक्तिकडे आधार कार्ड नसेल पण स्वतंत्र ओळख दस्ताऐवज असतील तर ते ओळख पटविण्यासाठी ग्राह्य मानले जाईल.
- लाभार्थीसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना अंतर्गत तसेच राज्य / केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजना अंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करने आवश्यक राहील.
- उत्पन्नाची मर्यादा तसेच लाभार्थ्यांची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ०२ लाखाच्या आत असावे याबाबतचे लाभार्थ्यांनी स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे.
- संबंधित व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे. याबाबतचे स्वयंघोषणापत्र लाभार्थ्यांना सादर करणे आहे, मात्र दोष पूर्ण तसेच अकार्यक्षम उपकरणे इत्यादींच्या बदलीला अपवाद म्हणून पात्रतेला परवानगी दिली जाऊ शकते.
- पात्र लाभार्थ्यांच्या त्यांच्या बँकेच्या आधार संलग्न असलेल्या बँक बचत खात्यात रुपये ३०००/- थेट लाभ वितरण प्रणाली द्वारे वितरित झाल्यानंतर, सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे प्रमाणपत्र सादर करने तसेच मन स्वास्थ्य केंद्र द्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांची देयक प्रमाणपत्र ३० दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम (CPSU) संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर ३० दिवसांच्या आत अपलोड करावे लागेल अन्यथा लाभार्थ्याकडून सदर लाभाची रक्कम वसूल करण्यात येईल.
- निवड केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांची संख्या पैकी 30% आरक्षण महिलांसाठी राखीव असेल.
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ साठी आवश्यक कागदपत्रे :-
- मतदान कार्ड / आधार कार्ड.
- राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स.
- पासपोर्ट साइज दोन फोटो.
- स्वयं- घोषणापत्र.
- शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी नमुद केलेली इतर कागदपत्रे.
हे पण पहा- मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-yuva-karya-prashikshan-yojana/#more-291
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ साठी पोर्टल तयार करणे :-
राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ साठी नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून तयार करण्यात येईल.
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ बद्दल जागरूकता निर्माण करणे:-
राज्य शासनाच्या मान्यतेने अंमलबजावणी यंत्रणाकडून Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ ची व्यापक माहिती प्रसिद्ध करण्यात येईल जेणेकरून लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबामध्ये तसेच सामान्य जनतेमध्ये योजनेचे अस्तित्व व त्या अंतर्गत उपलब्ध असलेल्या लाभांबद्दल पुरेशी जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल.
नियंत्रण व मूल्यमापन :-
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ नियंत्रण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे करण्यात येणार आहे. योजना सुरू होउन एक वर्ष पूर्ण केल्यानंतर आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्यामार्फत कार्यक्रमाचे मूल्यमापन अंमलबजावणी केली जाणार आहे. वितरण पद्धती, छाननी, अर्ज प्रक्रिया इत्यादी औपचारिकता अंमलबजावणी एजन्सी द्वारे निश्चित केल्या जाणार आहेत.
आर्थिक भार :-
अ) थेट लाभ खर्च-:
महाराष्ट्राचे एकूण लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार ११.२४ कोटी इतकी आहे. सद्यस्थितीत त्यापैकी ६५ वर्षावरील अंदाजे देखून १०-१२% (१.२५ ते १.५० कोटी) ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यापैकी प्रायोगिक तत्वावर वेगवेगळ्या व्याधी व अपंगत्वाने ग्रस्त तसेच मानसिक अस्वस्थाने पीडित १२.५ ते १५ लाख राज्यातील जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ देण्याचे ठरवले आहे. पात्र लाभार्थी मागे दरवर्षी रुपये ३०००/- नुसार एकरकमे अदा करणे अपेक्षित आहे. त्यानुसार थेट लाभ वितरण करिता एकूण {१५,००,०००* ३,०००= ४५०,००,००,०००/-} म्हणजेच ४५० कोटी (अक्षरी चारशे पन्नास कोटी) इतका कमाल अंदाजीत खर्च असेल.
ब) नोडल एजन्सी खर्च-
लाभार्थी खर्च २००रुपये याप्रमाणे (१५,००,०००* ३,०००= ३०,००,००,०००/-) म्हणजेच ३० कोटी रुपये इतका खर्च अंदाजे येणार आहे.
नोडल एजन्सी व केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था तसेच अंमलबजावणी संस्था यांच्याद्वारे लाभार्थी संबंधित सर्व कामे व थेट लाभ वितरण (D B T) प्रक्रिया द्वारे पार पाडून होईल.
क) Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ साठी शिबिराचे आयोजन:-
सार्वजनिक विभागाद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, उपकेंद्र यांच्यामुळे आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्यभर पसरले आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी तसेच असंसर्गज्यन्य रोग सर्वेक्षण अश्या अभियानांतर्गत ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते. अशाप्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहे.
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ च्या कामांचे स्वरूप :-
- पात्र लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करणे.
- आधार प्रमाणे करण करणे.
- बँक खाते व आधार जोडणी करणे.
- विभागाशी समन्वय साधणे.
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ चा प्रस्तावित खर्च पुढीलप्रमाणे :-
अ.क्र | तपशील | प्रस्तावित खर्च (लक्ष मध्ये ) |
१. | थेट लाभ वितरण खर्च (१५ लाख लाभार्थी यांना प्रति रू. ३००० प्रमाणे | ४५०००.०० |
२. | नोडल एजन्सी एकूण खर्च | ३०००.०० |
३. | शिबिर आयोजन खर्च | ००.०० |
४. | एकूण | ४८०००.०० |
लेखापरीक्षण :-
जी एजन्सी अंमलबजावणी करेल त्याच्या खाते संदर्भात वेळोवेळी सुधारित केलेल्या जनरल फायनान्स रुल (G.F.R.२०१७) च्या तरतुदीनुसार लेखापरीक्षणाच्या अधीन असतील.
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ साठी वार्षिक अंदाजे ४८० कोटी रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आलेले आहे. खर्चासाठी स्वतंत्रपणे लेखाशीर्ष घेण्यात येणार आहे. सद्यस्थितीत सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा खर्च भागविण्यासाठी या विभागाच्या अनुसूचित जाती उपाययोजनाअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना या राज्यस्तरीय योजनेमधील अर्थसंकल्पीय निधी Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ करिता पुनर्विनीयोजना द्वारे या विभागाच्या वृद्ध व अपंगांसाठी गृहे या योजनेअंतर्गत च्या २२३५ – १४३२ या लेखाशीर्ष अंतर्गत उपलब्ध करण्याचे योजिले आहे.
सदर शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने दिनांक ५ फेब्रुवारी २०१९ च्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे.
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ मुळे महाराष्ट्र राज्यांमधील अनेक ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून एक मोलाची मदतीचा हात मिळणार आहे . यातून ते आपल्या उदरनिर्वाहासाठी आणि सहज सोपे जीवन जगण्यासाठी आरोग्य विषयक जे उपकरण त्यांना आवश्यक आहेत ते सरकारकडून त्यांना मोफत मिळवू शकतात. Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ या योजनेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना या योजनेचा लाभ घेण्याची संधी द्यावी. जेणेकरून ते Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ च्या लाभापासून वंचित राहणार नाहीत.
महाराष्ट्र सरकार आपल्यासाठी असेच नव- नवीन सरकारी योजना आपल्या साथी अंमलात आणत असतं. पण या योजना आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत, अशाच योजनांना आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत. आता चर्चेत असलेली माझी लाडकी बहीण योजना, माझा लाडका भाऊ योजना आम्ही यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. अशा योजना सर्वाधिक पहिला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आमचा व्हाट्सअप ग्रुप दिलेले लिंक वर क्लिक करून जॉईन करा- https://chat.whatsapp.com/G0DyfdwhOuS4ewvEY3sov1
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा-https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-mazi-ladaki-bahin-yojana-2024/#more-233
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-yuva-karya-prashikshan-yojana/#more-291
मुख्यमंत्री लेक लाडकी योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/lek-ladaki-yojana-2024/
हे पण पहा- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-tirth-darshan-yoajana-2024/